logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

शहरात पहिल्यांदाच निवडून आलेले सर्वाधिक मतांचा विक्रम अॅड. गौरव गोवर्धने यांच्या नावे दणदणीत विजय चर्चेला उधाण

1

नाशिक : वार्ताहर
महापालिका निवडणुकीत पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड.गौरव गोवर्धने यांनी सर्वाधिक मते मिळवत प्रथमच नगरसेवक म्हणून दणदणीत विजय संपादन केला. गोवर्धने यांनी १६,७२९ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार अंबादास खैरे यांचा ९,०१८ मतांनी मोठ्या फरकाने दारूण पराभव केला.


अंबादास खैरे हे मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय तथा ‘मातब्बर’ म्हणून ओळखले जाणारे दिलीप खैरे यांचे बंधू असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. माजी खासदार समीर भुजबळ व शेफाली भुजबळ हे देखील या प्रभागात तळ ठोकून होते त्यांनी खास वैयक्तिक लक्ष केंद्रित केले होते.त्याचबरोबर
समता परिषदेचे पदाधिकारी व भुजबळ समर्थक तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रभागात मोठ्या संख्येने प्रचार करत होते. मात्र मतदारांनी भाजपाच्या तरुण नेतृत्वाला स्पष्ट कौल दिला. प्रचाराच्या सुरुवातीला जाणवलेले आव्हान प्रत्यक्ष निकालात पुरेसे ठरले नाही, हेच निकालातून स्पष्ट झाले.  गोवर्धने यांचा जनसंपर्क आणि मित्रत्वाचे संबंध याच्या बळावर त्यांनी विजयाचा मार्ग सहज पार केला.
सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गौरव गोवर्धने यांनी प्रभागात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. रस्त्यावर उतरून काम करण्याची शैली आणि नागरिकांशी सतत संवाद हेच त्यांच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. मतदारांनीही मतपेटीतून भरभरून प्रतिसाद दिला. या निवडणुकीत विजयी उमेदवार अ गटातून प्रियंका माने १४२१४ ब गटातून जुई शिदे १४२०५ क गटातून मच्छिंद्र सानप ११७२१ ड गटातून गौरव गोवर्धने १६७२९ यांनी सर्वाधिक मते मिळवत विजय मिळविला.


अॅड गौरव गोवर्धने यांच्या   प्रवेशामुळे या प्रभागात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून त्यांच्यामुळेच या प्रभागात चारही जागांवर कमळ फुलले अशी चर्चा प्रभागात रंगू लागली आहे. या चारही उमेदवारांना निवडून आणण्यास भाजपाचे आमदार राहुल ढिकले व  माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे मार्गदर्शन व मोलाची साथ लाभली.आगामी काळात होणारा कुंभमेळा साधुग्राम व तपोवन याच प्रभागात आहे. तसेच प्रशासना देखील जनसंपर्क असलेले नगरसेवक गोवर्धने यांची मोठी मदत होईल. त्यामुळेच पक्षश्रेष्ठीकडून व या दोघांचे विश्वासू सहकारी असलेले, सुशिक्षित व अभ्यासू ,कायद्याचे ज्ञान असलेले नगरसेवक अॅड. गौरव गोवर्धने यांच्यावर महापालिकेत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असा विश्वास प्रभागातील पदाधिकारी, नागरिक व समर्थक व्यक्त करीत आहेत.

0 Comments