logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

प्रभाग 20 मधील मविआच्या उमेदवारांचा प्रचार सुरू:सर्वत्र वाढता पाठिंबा

प्रभाग 20 मधील मविआच्या उमेदवारांचा  प्रचार सुरू:सर्वत्र वाढता पाठिंबा

नाशिक : प्रतिनिधी 
नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २० मधील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अश्विन पवार(अ), गायत्री गाडेकर (ब), योगिता गायकवाड(क) आणि हेमंत गायकवाड(ड) यांच्या प्रचाराचा शुभारंभ अंगारिका चतुर्थीचा मुहूर्त साधून जय भवानी रोडवरील गणपती मंदिर व तुळजाभवानी मंदिर येथे नारळ वाढवून आणि तेथे वचननाम्याची प्रत ठेवून करण्यात आला.
हरित प्रभाग करणे,विद्यार्थ्यांनसाठी जयभवानीरोड व शिखरेवाडी मोफत 
सुसज्ज अभ्यासिका , पादचाऱ्यांसाठी फुटपाथ व सायकल पार्क, मोफत रुग्णवाहिका सेवा, रस्त्यांचे रुंदीकरण,भुयारी गटारी आणि प्रभागात सर्वत्र मुबलक पुरवठ्याचा निर्धार वचननाम्यात करण्यात आला आहे. शिखरेवाडी उद्यान अद्ययावत करणे, प्रभागात चिल्ड्रेन पार्कची निर्मिती, वाहतूक कोंडी रोखण्यास कायमस्वरूपी उपायोजना तसेच शिखरेवाडी आणि आशेर इस्टेट भागतील फनेल झोनच्या मर्यादा कमी करण्यासाठी पाठपुरावा करू व रिडेव्हलपमेंटमधील बांधकामे तसेच प्रभागाचा नियोजित विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहू असा मानसही वचननाम्यात देण्यात आला आहे. प्रभागातील गंधर्वनगरी , शिखरेवाडी, कलानगर, डावखर वाडी ,सानेगुरूजी नगर. जेतवन नगर, दत्तमंदिर परिसर , शाहू नगर, गायखे मळा, लोकमान्य नगर , सिध्दी काॅलनी , नवले चाळ, के.जे.मेहता परिसर , गायकवाड मळा आदी परिसरात उमेदवारांनी रॅली काढली असता सर्वत्र त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. व्यापारी वर्गानेही या सर्वांना मोठा पाठिंबा जाहीर केला आहे.

0 Comments

Related Posts

How We Can
Help You!

Feel Free to contact us for further assistance regarding Blog, News! We would be glad to assist you further.

Contact Us