logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मयुर अलंकार शोरूममध्ये सोन्याच्या खरेदीसाठी उसळलेली ग्राहकांची मोठी गर्दी.

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीसाठी नागरिकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. शहरातील मयुर अलंकारच्या चारही शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती.


या दिवशी २४ कॅरेट चोख सोन्याची नाणी आणि वेढे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा विशेष कल दिसून आला. तसेच गुंतवणूक आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर पेशवाई नेकलेस, तुर्की डिझाईन आणि लाईटवेट दागिन्यांच्या आकर्षक कलेक्शनला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला.


सोन्याचे दर सध्या स्थिर असल्यामुळे खरेदीचा उत्साह अधिक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर भविष्यात चांदीचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता चांदीलाही मोठी मागणी दिसून आली.
दरम्यान, तपोवन लिंक रोडवरील काठे गल्ली येथील शाखेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.

0 Comments