logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

अंकिता पांडे व सोना शर्मा यांचा शुभ विवाह संपन्न

1

अंकित पांडे व सोना शर्मा यांच्या शुभविवाह थाटात 

नाशिक : वार्ताहर

गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे संस्थापक के. सी. पांडे यांचे पुतणे किरण पांडे व रमेशचंद्र पांडे यांचे चिरंजीव अंकित पांडे तसेच उद्योगपती अर्चना शर्मा व सुनील शर्मा यांची कन्या सोना शर्मा यांचा शुभविवाह पाथर्डी फाटा येथील गेट वे ताज येथे मोठ्या थाटात पार पडला.

या विवाह सोहळ्यास सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, माजी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, ठाकरे परिवारातील स्मिता ठाकरे, वृंदावन कैलास मठाचे स्वामी संविधानंद, श्री जगतगुरु इंद्रप्रस्थ पीठाधीश्वर पुरुषोत्तमाचार्य महाराज, डॉ. रविंद्र सपकाळ, नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेवक दिनकर पाटील, विक्रम नागरे, अमोल पाटील, प्रशांत दिवे, स्वप्निल पाटील, रोहन देशपांडे, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड, बांधकाम व्यावसायिक अविनाश यादव, संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आयएफटीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एम. दुबे, राहुल एज्युकेशनचे संचालक डॉ. मयूर दुबे व प्राध्यापक डॉ. कीर्ती दुबे यांनीही उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशिर्वाद दिले. मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 

नाशिक : वधु- वरांना शुभआशीर्वाद 

देतांना श्री जगतगुरु इंद्रप्रस्थ पीठाधीश्वर पुरुषोत्तमाचार्य महाराज ,गारगोटीचे संस्थापक के.सी.पांडे. ( छाया : जगदीश सोनवणे.

0 Comments

Related Posts

How We Can
Help You!

Feel Free to contact us for further assistance regarding Blog, News! We would be glad to assist you further.

Contact Us