प्रभाग 23 मधील पाणीटंचाईवरून आंदोलनाचा इशारा : नगरसेविका संध्या कुलकर्णी आक्रमक
नाशिक : वार्ताहर
अशोका मार्ग, पखाल रोड आणि संत सावता माळी मार्ग परिसरातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी महानगरपालिका प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला आहे.
प्रभागातील नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन नगरसेविका कुलकर्णी या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाग 23 मध्ये अनेक जलकुंभ, दोन मोठे भूमिगत संप तसेच 12, 8, 6 आणि 4 इंच व्यासाच्या पाणी पाइपलाईन माजी महापौर सतीश कुलकर्णी व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून टाकण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी नागरिकांसह संबंधित अधिकारी रविंद्र धारणकर, निकम साहेब, डी. बी. जगताप आणि संजय गायकवाड यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. येत्या दोन ते तीन दिवसांत तातडीने उपाययोजना करून पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी प्रशासनाला
0 Comments