logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

नाशिकच्या हायटेनसिटी क्रॉसफिट क्लबची बँकॉकमध्ये दमदार कामगिरी

नाशिकच्या हायटेनसिटी क्रॉसफिट क्लबची बँकॉकमध्ये दमदार कामगिरी
नाशिक : 
थायलंडची राजधानी बँकॉक येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड हायरॉक्स कॉम्पिटिशन २०२६ स्पर्धेत नाशिकच्या हायटेनसिटी क्रॉसफिट क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत देशाचा गौरव वाढविला आहे.
जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठित फिटनेस स्पर्धेत विविध देशांतील सुमारे ४ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. आठ कठीण अडथळ्यांवर आधारित या स्पर्धेत शारीरिक तसेच मानसिक क्षमतेची कसोटी लागते. अशा आव्हानात्मक स्पर्धेत नाशिकच्या ७ खेळाडूंनी उत्कृष्ट तयारी, चिकाटी आणि संघभावना दाखवत प्रभावी कामगिरी केली.
विशेष म्हणजे, एडेप्टिव्ह (अपंग) गटात शुभम सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळविले. तसेच हायरॉक्स डबल्स प्रकारात अजिंक्य साहू, शंभव डबरी, श्रेयांश सराफ, सुमित साहू, निल शाह आणि रुशी पोखरणा यांनी सहभाग घेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
या यशामागे मुख्य प्रशिक्षक अजिंक्य भालचंद्र साहू यांचे दर्जेदार मार्गदर्शन आणि कठोर प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. त्यांच्या नेतृत्वाखालील संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकच्या फिटनेस क्षेत्राची छाप पाडली आहे.
या यशामुळे नाशिकसह संपूर्ण देशातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

0 Comments