logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

“केबल कॉर्पोरेशनचे जुने मित्र पुन्हा एकत्र… १९९७ ची मैत्री आजही तितकीच घट्ट!”

नाशिक : 
केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (सीसीआय) सिन्नर या कंपनीत १९९७ साली नोकरीची सुरुवात केलेल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्ना निमित्ताने जुने मित्र पुन्हा एकदा एकत्र आले. अनेक वर्षांनंतर सर्व मित्र भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि वातावरण आनंदाने भारावून गेले.
नोकरीच्या सुरुवातीच्या काळात सर्वांचे वय साधारणपणे १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान होते. आयुष्याच्या नव्या टप्प्यात पाऊल टाकताना एकमेकांची साथ, मेहनत आणि जिद्द यामुळे त्या काळात घट्ट मैत्रीचे बंध निर्माण झाले. आजही सीसीआय कंपनीच्या परिवाराचा भाग असल्याचा सर्वांना अभिमान वाटतो.


या भेटीत जुन्या दिवसांच्या आठवणी, कामाचे अनुभव, एकत्र केलेली मेहनत, डब्यातील गप्पा आणि केलेली मस्ती यांची मनमोकळी चर्चा रंगली. अनेक वर्षांनी मित्रांना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.
काळाच्या ओघात नोकरीच्या निमित्ताने काही मित्र वेगवेगळ्या शहरांत स्थायिक झाले, तर काहीजण आपल्या कामानिमित्त इतर ठिकाणी गेले. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात पुढे गेला; मात्र सुरुवातीच्या काळात जुळलेली मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचे या भेटीतून प्रकर्षाने जाणवले. वर्षानुवर्षे संपर्क कमी झाला असला, तरी मनातील आपुलकी आणि जिव्हाळा मात्र तसाच कायम असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.खऱ्या अर्थाने ही निस्वार्थ मैत्री असल्याचेही मित्रांनी सांगितले. कोणताही स्वार्थ नाही, फक्त विश्वास, आपुलकी आणि आठवणींची श्रीमंती यावर उभी असलेली ही मैत्री आजही तितकीच जिवंत आहे. सर्व मित्र पुन्हा एकत्र आल्याने मोठा आनंद व्यक्त करण्यात आला आणि भविष्यातही अशाच प्रकारे वेळोवेळी भेटत राहण्याचा संकल्प करण्यात आला.

0 Comments