logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

सिडकोत साई महोत्सवाचा भव्य जल्लोष; शोभायात्रा आणि महाप्रसादासाठी हजारो भाविकांची उसळलेली गर्दी

नाशिक : प्रतिनिधी 

नाशिक शहरातील जुने सिडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री साईनाथ मंदिराचा १५ वा वर्धापन दिन साई महोत्सवाच्या रूपाने भक्तिमय आणि उत्साही वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आयोजित या दोन दिवसीय महोत्सवात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. साईनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत साई पालखी, नंदूरबार माऊली वाद्य पथक, कर्नाटक येथील पिली वेशा पथक, विविध सांस्कृतिक सादरीकरणे, साईबाबांचे १२ फूट चलतचित्र, लेझीम पथक, वारकरी संप्रदाय तसेच राष्ट्रवीर संघाचे युद्धकला प्रात्यक्षिक यांचा समावेश होता. ढोल पथक, महाकाली पथक, डीजे, लेझर शो आणि आतिषबाजीमुळे वातावरण अधिकच भारावून गेले.


दुसऱ्या दिवशी झालेल्या महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. सिडको परिसरातील रस्त्यांवर भक्तांची प्रचंड वर्दळ दिसून आली. विशेष म्हणजे मोठी गर्दी असूनही उत्तम नियोजनामुळे महाप्रसाद वितरण सुरळीत पार पडले.
साईभक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महोत्सव अत्यंत यशस्वी झाल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले.

0 Comments

Related Posts

How We Can
Help You!

Feel Free to contact us for further assistance regarding Blog, News! We would be glad to assist you further.

Contact Us