logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

प्रत्येक गावात ‘गाव प्रमुख’; कामगिरीवरच पद युवासेना बैठकीत पूर्वेश सरनाईक यांचा इशारा

नाशिक :

युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागाच्या युवा संघटन दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे पार पडली. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेऊन आगामी कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.


संघटन मजबूत करण्यावर भर देत महसूल विभाग स्तरावर १५० सदस्यांची कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “काम करणाऱ्यांनाच संधी व पदोन्नती मिळेल, तर निष्क्रियांवर कारवाई केली जाईल.” कार्यकर्त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण सुरू असून त्यानुसार पुढील जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 


प्रत्येक महाविद्यालयात युवासेनेचे युनिट स्थापन करण्यासोबतच गावागावात ‘गाव प्रमुख’ नेमण्यावर भर देण्यात येणार आहे. युवती सेनेलाही संघटनेत समान स्थान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, १८ तारखेला मुंबईतील वरळी डोम येथे होणाऱ्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.युवा सेना विभागीय सचिव उत्तर महाराष्ट्र अविष्कार भुसे यांनी सांगितले की, “प्रत्येक गाव आणि महाविद्यालयापर्यंत युवासेना पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करून संघटना बळकट करावी.”ते पुढे म्हणाले, “युवासेना ही तरुणांची ताकद आहे. संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.”


यावेळी युवासेना सचिव किरण साळी, कोअर कमिटी सदस्य सिधु अभंगे,अभिषेक चौधरी ,हर्षदा गायकर, जिल्हाप्रमुख सदानंद नवले, फरान खान,रूपेश पालकर ,किरण फडोळ, आदित्य बोरस्ते, दिगंबर नाडे,वैभव अरिंगळे, विशाल खैरनार, शुभम घुले, स्वाती देशमुख, अर्चना भांबड आदींसह उत्तर महाराष्ट्रातील  जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, लोकसभा व विधानसभा संघटक, शहर व तालुका पदाधिकारी तसेच युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments