logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

Nashik

सातपूर-अंबड लिंक रोड अपघातानंतर संताप; आयुक्त 
दालनात धरणे आंदोलन
नाशिक: सातपूर-अंबड लिंक रोडवरील विराटनगर फाटा येथे झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रभाग क्रमांक २६ चे नगरसेवक निवृत्ती इंगोले व नितीन दातीर यांनी केले. अपघातास जबाबदार असलेल्या महापालिका अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते व उपमहापौर विलास शिंदे यांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
तथापि, या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 Comments