logo
Breaking News
👉 क्लिक नाशिक न्यूज , प्रेक्षकांचा विश्वास.... आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख.

नाशिक हादरलं! ज्योतिषी अशोक खरात अटकेत; फसवणूक व अत्याचाराचा आरोप

नाशिक :
शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली असून, महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली हायप्रोफाइल ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. दैवी शक्तीचा दावा करत मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.


तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एका पेनड्राइव्हमध्ये साठवलेले तब्बल ५८ व्हिडिओ लागले असून, या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे. या व्हिडिओंच्या आधारे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, आरोपीचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा रंगत असून, या प्रकरणामुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित सर्व बाबींचा सखोल छडा लावला जात आहे.

0 Comments