“नववर्षाची सुरुवात स्वच्छतेच्या संकल्पाने; नाशिक मनपाचीची नंदिनी नदी परिसरात स्वच्छता मोहीम”
“नववर्षाची सुरुवात स्वच्छतेच्या संकल्पाने; नाशिक महानगरपालिकेची नंदिनी नदी परिसरात स्वच्छता मोहीम”
नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्यावतीने दि. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वा. नाशिक शहराची जीवनवाहिनी असलेल्या नंदिनी नदी परिसरात व्यापक व सुनियोजित स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
नवीन वर्षाची सुरुवात केवळ घोषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून व्हावी या उदात्त उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंदिनी नदी स्वच्छ, सुरक्षित व प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. या स्वच्छता मोहिमेत नाशिक महानगरपालिका, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व निसर्गसेवक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासनाचे काटेकोर नियोजन आणि नागरिकांचे उत्स्फूर्त श्रमदान यांचा आदर्श संगम पाहावयास मिळाला. नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्था तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.
ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून, नंदिनी नदीच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी उभारली जाणारी एक सातत्यपूर्ण व जनसहभागावर आधारित लोकचळवळ आहे. नाशिककरांनी आपल्या पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला, ही बाब निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त मा. करिष्मा नायर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक अजित निकत, गोदावरी संवर्धन उपायुक्त नितीन पवार, अमित कुलकर्णी, शीतल सोनवणे-उगले, मनोज साठे, हर्षल आहेर, चंदू पाटील, रत्नाकर औटी यांच्यासह सिडको, सातपूर, नाशिकरोड व पंचवटी विभागातील स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक, पर्यावरणप्रेमी नागरिक व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासन व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात आलेली ही स्वच्छता मोहीम नंदिनी नदी संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक, प्रेरणादायी व आशादायी पाऊल ठरली आहे.
आगामी वर्षी होणाऱ्या नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर “स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक व हरित नाशिक” या संकल्पनेला अधिक बळ देणारा हा उपक्रम निश्चितच नाशिक शहराच्या सकारात्मक व पर्यावरणपूरक प्रतिमेला नवी दिशा देणारा ठरेल.
“स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नाशिककराची सामूहिक जबाबदारी असून स्वच्छतेच्या या चळवळीत नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे,” - मा. अतिरिक्त आयुक्त मा. करिष्मा नायर
0 Comments